‘पत्र आणि मैत्र’ : मराठी साहित्यव्यवहाराचे आणि विशेषत: मुद्रण\प्रकाशन-संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या ग्रंथातून लेखक, वाचक आणि समीक्षक ही त्रिपुटी नेमकी कशी आहे, हेही उमगते

दिलीपरावांविषयीचे लेख आणि त्यांच्या मुलाखती यांशिवाय या ग्रंथामधील अत्यंत महत्त्वाचा भाग त्यांनी लिहिलेली पत्रे. यातील सर्वाधिक पत्रे दिलीपरावांनी आपल्या लेखकांना लिहिली आहेत. आणि बहुतेक वेळा ही पत्रे संबंधित लेखकाच्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्याशी साधलेला एक प्रकारचा मुक्तसंवाद आहे. दिलीपरावांनी जिथून आपली कारकीर्द सुरू केली, त्या नियतकालिकाचे नावच ‘माणूस’ होते.......

मी ‘सुधारक युगा’तील पर्वांची मांडणी करताना आदी पर्वाला ‘फुले-रानडे पर्व’, मध्य पर्वाला ‘टिळक-शिंदे-शाहू पर्व’ आणि अंतिम पर्वाला ‘गांधी-शिंदे-आंबेडकर पर्व’ असे म्हटले आहे (उत्तरार्ध)

फुले-रानडे पर्वाची पूर्वतयारी दादोबा पांडुरंग, लोकहितवादी आदि यांनी केली होती. त्यांची मांडणी महत्त्वाची असली तरी त्यांचा ठसठशीत प्रभाव पडून त्यातून स्वतंत्र परंपरा निर्माण होऊ शकल्या नाहीत. एरवी फुले आणि रानडे यांच्या धर्मसमाजांची मुळे दादोबांमध्ये शोधता येतात. लोकहितवादी तर ब्राह्मणांचे आद्य टीकाकार. फुल्यांपासून तर प्रबोधनकार ठाकरे व आंबेडकर यांच्यापर्यंतच्या सुधारकांना त्यांचा उपयोग झाला आहे.......

आगरकरांविषयी विशेष सहानुभूती असूनही लेखकांनी टिळकांना जास्तीत जास्त समजून घेऊन जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे, हे या चरित्राचे वैशिष्ट्य आहे

भागवत-प्रधानांचा प्रस्तुत चरित्रग्रंथ वेगळ्या आणि स्वतंत्र भूमिकेतून लिहिला आहे. त्यामुळे त्याचे स्थान अबाधित आहे. दुसरे असे की, त्यांनी टिळकविचारांचे विवेचन करताना आंतरराष्ट्रीय भूमिकेतून व आशिया खंडाला केंद्रस्थानी ठेवून केले आहे. त्यामुळे वर्तमान परिस्थितीतही ते उपयुक्त ठरेल. इंग्रजीत असल्यामुळे मराठी वाचक मागील ६५ वर्षे या चरित्रग्रंथाला वंचित झाला होता. ही उणीव आता भरून निघाली आहे.......